“सामंतर” हे बर्याच वर्षांनंतर असे पुस्तक आहे, जे मी एकाच दिवसात वाचून संपवले!
मराठी कॉमेडी नाटकसाठी ऑनलाईन शोध घेताना, योगायोगाने मी “सामंतार” या वेबसिरीज वर पोहोचलो. सीझन finale होईपर्यंत मल्टी सीझन वेब सिरीज न पाहण्याचा माझा नियम मोडला. हल्ली च्या भाषेत ला ‘प्रोमो’ आणि आपल्या भाषेतला ‘ट्रेलर’ आवडला. ज्योतिष विषयाभोवती असलेल्या या मालिके interest घ्याचे कारण म्हणजे, नुकतेच idiagress वर astrology चे पेज चालू केले आहे. त्यामुळे हा विषय मनात फिरताच राहतो (मालिका पहाण्यासाठी आणि पुस्तक वाचण्यासाठी घालवलेला वेळ लक्षात घेतला तर, कदाचित माझ्याबरोबर आधीच पडलेल्या पाच लेखांचे editing केले असते तर, वेळेचा जास्त सदुपयोग झाला असता. पण असो, असे म्हणतात, प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, कदाचित या लेखांचीसाठी निश्चित वेळ अजून आलेली नसेल)
या मालिकेत महाराष्ट्राचा देव आनंद चक्क-चक्क एका middle-aged professional च्या भूमिकेत आहे. जयंत सावरकर स्वामी म्हणून, नीतीश भारद्वाज उर्फ कृष्णा, सुदर्शन चक्रपाणीच्या भूमिकेत. वेब सीरिजच्या सर्व नियमांचे पालन करत ही मालिका cliffhanger मध्ये संपते. कुतहुलाने ऑनलाइन शोधले, पुढचा सीझन निदान सहा महिने लांब आहे. त्याच कुतूहलामुळे मला कळले की वेबसीरीज सुहास शिरवळकर (दुनियदारी यांचे लेखक) लिखित “सामंतर” या पुस्तकावर आधारित आहे. लगेच amazon वर सर्च मारला, to my surprise, पुस्तक available, डिलिव्हरी इन two days! Amazon आणि मराठी पुस्तकांमध्ये काही वैर आहे. जर आपण काही सुपरहिट पुस्तके सोडली तर कोणतीही मराठी पुस्तक शोधा, तुम्हाला कदाचित त्या नावाची फ्रान्समधील फोटो फ्रेम मिळेल, परंतु पुस्तक नसणार.
पुस्तक मिळतंय, लगेच ऑर्डर केले, तिसऱ्या दिवशी पुस्तक दारात.
पुस्तकाचा आकार पाहून मला धक्का बसला. आकार अंदाजे चार इंच बाय पाच इंचाचा. पॉकेट डायरीपेक्षा किंचित जास्त आणि पाठ्यपुस्तकापेक्षा बरेच लहान, अशी हि गजब साईज.बर्याच वर्षांपूर्वी एका दुसर्या पुस्तकामुळे मला असाच धक्का बसला होता. ते पुस्तक होते “Keys to English Grammar “. इंग्रजी व्याकरणाच्या व्रेन आणि मार्टिन याचे उत्तर पुस्तक. फुलस्केप पुस्तकापेक्षा उंच, गीतापेक्षा जाड, वजन असे कि आपण व्यायाम करू शकतो अश्या व्याकरण ग्रथांचे उत्तर पुस्तक एवढे छोटे, हलके, एक्दम न शोभणारे. हे सध्य करण्यासाठी अतिशय small प्रिंट चा वापर केला होता. वीस पैकी केवळ पाच निबंधांना उत्तरे, प्रश्नांची उत्तरे एका शब्दात. प्रश्न adverb clause ओळखा, त्याला केवळ clause टाइप केला होता. एरवी पूर्ण वाक्यात उत्तरे लिहा म्हणाऱ्या व्याकरणाच्या उत्तर पुस्तकात मात्र शॉर्टकट. दिव्या खाली अंधार, अजून काय.
असो, हे पुस्तक पण small प्रिंट मध्ये आहे कि काय, या भीतीने मी पुस्तक उघडले. नशीब चांगले, व्यवस्तीत प्रिंट होता, साईज १२. पुस्तक जेमतेम दोनशे पानांचे, निश्चय केला आजच वाचून टाकावे.
कुमार महाजन (स्वप्निल जोशी) ज्योतिषाकडे जाण्यापासून “सामनार” सुरू होते. स्वामी कुमारच्या हाताकडे पाहतात आणि म्हणतात की त्याने हाच हात अगदी तीस वर्षांपूर्वी पाहिलेला आहे. याच हस्तरेषा असलेला सुदर्शन चक्रपाणी नावाचा एक माणूस त्त्यांच्याकडे आला होता. स्वामींनी त्यांना तेच उत्तर दिले जे ते कुमारला देतात, ‘मी तुझे भविष्य सांगू शकत नाही.’ स्वामी म्हणतात की तुमच्या दोघांचेआयुष्य तीस वर्षांच्या फरकाने समांतर चालले आहे, या पलीकडे ते काही सांगत नाहीत.
रोजच्या त्रासातून कंटाळलेल्या कुमार, उत्तरे मिळवण्यासाठी चक्रपाणीचा शोध घेण्याचा निर्णय घेतो. त्याला वाटते चक्रपाणीचा भूतकाळ हा त्याचा भविष्यकाळ आहे, त्यातून शिकून रोजच्या समस्येतून सुटका होईल. बर्याच प्रसंगानंतर कुमारला चक्रपाणी सापडतो. चक्रपाणींनी आपल्या आयुष्यातील एकूणएक घटनेची नोंद असलेल्या डायऱ्या ठेवल्या असतात. त्या तो कुमारच्या स्वाधीन करतात. परंतु तो एक अट टाकतो, तो फक्त दुसर्या दिवसाचे पान फक्त एकच दिवस आधी वाचू शकतो. आणि, असे म्हणून कथा पुढे सरकते.
पुस्तक हे कुमारच्या दृष्टीकोनातून केलेले कथन आहे. पुस्तक वाचताना माझ्या डोक्यातला आवाज हा ‘स्वप्नील जोशी’चाच राहिला. काय गम्मत आहे ना. पुलंचे कथाकथन ऐकल्यानंतर पुलंचा कुठलंही पुस्तक घ्या, मनात आवाज येतो तो पुलंचाच. “म्हैस” वाचताना डोळ्यासमोर लगेच कोकण येत नाही, आधी येतो पुलंचा चेहरा, त्यांचा स्वर मनात फिरतो, आणि त्यानंतरच त्यांच्या आवाजातल्या कोणाकाचे दर्शन घडते. त्यामुळेच कि काय, “असा मी असामी” नाटकरूपात आले, तेव्हा ते मनाला काही पटले नाही. पुलंची धान्यनिफीत अजूनही सरस वाटते. असो, “समांतर’ विषयाबद्दल बोलताना उगाच फाटे फोडणे भूमितीला पटणार नाही.
वेबसीरीज विकसित करताना, निर्मात्यांनी पुस्तकाच्या कथेत काही बदल केले आहेत. Thankfully, पुस्तकाचा आत्मा टिकविला आहे. पुस्तकांची कथा १९७५ च्या काळात घडते, वेबसीरीज, एकविसाव्या शतकातली आहे. मोबाईल फोन, जागांची नवे, असे माफक बदल आहेत. पुस्तकातील पन्हाळा पूर्णतः ओसाड आहे, काळाप्रमाणे ते आता तेवढे ओसाड राहिले नाही एवढेच. चांगली गोष्ट म्हणजे पात्रांची नावे सारखीच ठेवली आहेत. काहीही बोला, पण सुदर्शन चक्रपाणी या नावातच एक रहस्य आहे. तथापि, वेबसिरीजचा स्वामी पुस्तकाच्या तुलनेत जास्त menacing आहे. जयंत सावरकरानी या पात्रात चांगलाच रंग भरला आहे. पुस्तकाचा स्वामी दयाळू आहे, वेबसीरीजचा स्वामी अधिकच रोखठोक. त्याचा परिणाम कि काय, पुस्तकाचा क्लायमॅक्स थोडा मनाला पटला नाही, कारण त्यात स्वामी आलेच नाहीत. सतत वाटत होतं कि स्वामी कथेत परतयेतील, पण ते काही आले नाहीत. याचे श्रेय पूर्णतः वेबसीरीजच आहे, कारण पुस्तकातला स्वामी निमित्तमात्र आहे, वेबसीरीजचा स्वामी चिथावणी देणारा आहे.
वेबसीरीजच कडून आता बर्याच अपेक्षा आहेत, पहिले म्हणजे स्वामींना परत आणा, दुसरे म्हणजे कृपा करून तिसरा सीझन काढण्याच्या मोहात पडू नका. उगाच एका tight कथेला मिळमिळीत करून वाट लावू नका. या वेबसीरीज कडून शिकून जर उद्याच्या निर्मात्यांनी मराठी पुस्तके, कथा, पद्यावर आणल्या तर खूप चांगले होईल, उगाच हिंदी चित्रपट, सिरीयलची कॉपी करण्याचा मोह टाळला तर बरे होईल. मराठी साहित्य श्रीमंत आहे, बाहेर भीक मागून त्याचा अपमान करू नका.
पुस्तक amazon वर आहे, किंमत २०० रु. : Amazon Link
वेबसीरीज MXplayer वर फ्री मध्ये उपलब्ध आहे. MXplayer च्या गूढ revenue मॉडेल वर चर्चा केली असती, पण उगाच फाटे नको फोडायला. (भूमिती) : Mxplayer Link
Two actors, who played Krushna, there too one was the past and the other the future, added the character is named Sudarshan Chakrapani. Makers of the series did bring in a lot of Krushna element and finally left everything in the hands of destiny maker. For a moment I did wish there could have been a different ending. With all twists and turns, the possibility was quite ripe, but it ended the way it should have, in plam of the destiny.
ya, but have u considered, the ending was much better and less streched out than the book