थोर वीर महाराणा प्रताप

1906 textbook

मराठीचे पुस्तक सहावे ह्यातील हा एक धडा आहे. विसाव्या शतकाच्या सुरवातीला आपले पूर्वज काय नेमके शिकत होते ते ह्या पुस्तकातून थोडे फार कळते. पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशात इंग्रजांनी शाळा पद्धती सुरु केली होती. त्या काळी कदाचित मराठी, हिंदी, भूगोल, गणित, शाश्त्र,  इतिहास  असे वेगळे  विषय नसावेत. एकाच पुस्तकात सगळे समाविष्ट केले दिसून येते. त्या एकच  पुस्तकात इतिहास किंवा भूगोल असे वेळगे विभाग ही नाहीत. एका पाठोपाठ नुसते धडे आहे, मधेच अर्थशास्त्र येते, पाठोपाठ एकादी निसर्ग कविता, लागलेच डोंगर सफर आणि एकएक ऐतिहासिक वीरां बद्दल एखाधा धडा.

आता १९०० साल च्या सुरवातीला काय इतिहास शिकवणार? चाले जाव, करो या मारो, दांडी यात्रा, असहकार आंदोलन हे तर होणे होते. त्यातून अभ्यासक्रम इंग्रज सरकार ने ठरवलेला, म्हणजेच  सगळ्या वर ‘सेन्सॉर’ ची कात्री. पळवाट म्हणून की काय ह्यात पाश्चात्य इतिहासातील बरीच पत्रे डोकवून जातात. मग तो ग्रीसचा लिओनिडस  असो  की  नेपोलिअन बोनापार्ट. अजून तरी झंशीची राणी दिसलेले नाही ह्यात पुस्तकात, कदाचित पुढील वर्गात असेल तिचा धडा. पण नवल असे की महाराष्टरात असून छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल एक शब्द ही नाही. असो

पण एक आश्चर्य सापडले आणि ते म्हणजे  थोर महाराणा प्रताप ह्यांच्या वरील एक धडा. मनात पाल चुकचुकली,  काय हेतू असेल अशा थोर शूरवीर योध्याबद्दल एक सोडून चक्क दोन धडे ठेवलेत.  वेळ न दवडता, लगेच तो धडा सुरु केला. सुरवातीला वीर रसातल्या चारोळ्या आहेत. मनात थोडं हुश्य झाले, ‘होप्स’ वाढल्या.

धड्यातून  इतिहास शिकवला जात आहे, ह्याची जाणीव थोडी कमीच होते. पु.ल  ह्यांचे हरी तात्या आठवले. अत्यंत आत्मीयतेने लेखाने महाराणा प्रतापंची माहिती दिली आहे. जन्म कुठे झाला, तेंव्हा काय परिस्थिती होती, लढा कसा सुरु होता वगैरे वगैरे, एक्दम हरी त्यात्या स्टईल ने. असे वाटते की लेखक  त्या दिवशी तिथे रणांगणातच उभा होता की काय. माझ्या शिक्षण काळात इतिहास फार ‘ड्राय’ होता. नुसते सन, वर, कोण, कुठे आणि किती मेले, कोण जिंकले हे एवढेच. भावना शून्य असा इतिहास होता. त्या विपरीत हा धडा आहे. ओळीनिशी लेखक भरपूर अशा स्वतःच्या भावना व्यक्त करताना दिसतो.

सहावीतल्या मुलांना हा धडा नक्की आवडेल असा लिहिला आहे, कोण आहे हा वीर महाराणा, आपण ही तसे होऊ शकतो का, असे प्रश्न नक्की त्या पिढीला पडतील, ह्या विचाराने लेखक लिहीत असावा. आता हाच परिच्छेद पहा, ह्यात महाराणा प्रताप हल्दीघाटीच्या युद्ध नंतर कसे दिवस काढतो ह्याच वर्णन आहे. त्यात स्वतःच्या मुलीला होत असलेला त्रास मांडला आहे. वीर योद्धा असून ही आपल्या मुलीसाठी जीव कसा तुटतो, हताश होतो, हे वर्णिले आहे.  लेखक बऱ्याच ठिकाणी ह्या सर्व ऐतिहासिक पात्रांना ‘डायलॉग’ ही देतो. त्यामुळे  आपण ही त्या क्षणी तिथे उभे आहोत हा आभास तयार होतो. इतिहास जिवंत होतो, पुढे काय घडले, हे जाणून घेण्यास मन आतूर होते.

नुसते सन आणि वार  ह्या वर भर ना देता, तो काय तो ‘इमोशनल कोशंट’ ला ही वाव दिला आहे. भावनेस साधं घालून इतिहास जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा हा प्रयत्न. आपली गुरुकुल पद्धत ह्यात दिसत नाही, थोडीशी डोकावून  जाते.

एक मासा, माकड, साप, आणि पक्षी सगळ्यांना जर सांगितले की झाडावर चढा, जो पहिला येईल तो उत्तम. आता माशाने काय करायचे? सगळ्यांना पाण्यात पोहायला सांगितले तर ते सर्वांना जमेल का? हीच आपल्या शिक्षण पद्धतीची शोकांतिका. नुसते ठोकळे बनवणे हा एकमेव ‘गोल’ होय.  सगळ्यांनी सरासरी ‘परफॉर्म’ केले तरी देशाची प्रगती निश्चित. ही प्रुशिअन शिक्षण पद्धती. तिची स्थापना ही माणसाची यंत्र बनवण्या साठीच झाली आहे. सगळ्यांना सगळे थोडे थोडे आले पाहिजे. कोणात प्रतिभा आहे का? किंवा कोणात नेमकी कोणती खुबी आहे ह्याची प्रचिती यावी असे काही नाही. यंत्र रूपी माणूस तयार झाला पाहिजे, मग त्याचा इंजिनीयर होवो, की कारकून, की साहेब अथवा शिपाई, सगळ्यांनी एक ठरावीक काम केले पाहिजे, म्हणजे झाले.

शिक्षण पद्धतीतून माणूस घडवणे असा काही कस नाही सध्याच्या काळाचा. त्याचा अभाव दिसतो ह्या पुस्तकात. हे पुस्तक नेमके कुठल्या वर्षी शिकवले जात होते सांगणे कठीण आहे, पण १९११ नंतर नक्की, कारण ह्यात के धडा ‘टायटॅनिक ची जलसमाधी’ ह्या नावाने आहे. महाराणा प्रताप पुढे कसे लढत राहिले, काय काय संकटे आली, कसे त्या सर्वांना ते सामोरे गेले ह्या सर्वांचा रोमहर्षक आणि विस्तृत वर्णन केले आहे. कसे राणा प्रताप ह्यांवरच सर्व राजपूत अस्मिता टिकून होती ह्याची वारंवार जाणीव लेखक करून  देतो.  एकीकडे काही राजपूत अकबराची चाकरी करत होते, पण त्यांना ही राणा प्रतापचा कसा अभिमान होता हे लेखक निदर्शनास आणतो. एकूण काय शत्रू ही महाराणा प्रताप ह्यांना एक उंच पदावर पाहतो हे अधोरेखित होते.

चित्तोड गड हा मुघलांच्या हातही गेल्याचे दुःख राणा प्रताप ह्यांना अखेर पर्यत सोबत देते. अख्खे तारुण्य चित्तोड गड परत घेण्यास त्यांनी घालवले, त्यांच्या पूर्वजांनी ह्याच गडाचे रक्षण करताना रक्ताचे पाट पडले, तरी तो गड दूरच. उदयपूरच्या घाटावरून चित्तोड गड त्यांना साद देत असे. उतरत्या काळात थोडे यश दिसू लागले पण शरीर खंगत चालेले होते, प्राण ही जाईना. ज्यासाठी  अख्खे आयुष्य वेचले, ते कर्तव्य पूर्ण सध्या झाले नाही, गड अजून ही खुणावत होता, आपला देश परकीय तुर्क्यांच्या हाती जाईल ही भीती स्वस्त होऊ देत नव्हती. अखेरीस जेंव्हा सर्व सरदारांनी महारांना आश्वस्त केले की, आपले स्वातंत्र्य मिळाल्या खेरीज आम्ही हवेल्या बांधणार नाहीत, चैनी, कसले ही शौक करणार नाही, युवराज अमरसिंग ह्यांच्या पाठीशी छातीची ढाल करून उभे राहू, असे आश्वस्त केल्या वर महाराणा प्रताप ह्यांनी आपले प्राण सोडले.

ह्यात पुन्हा आपल्याला दिसून येते की भावनिक साद घातली गेली आहे. इतिहासा सारखा हा विषय भावनाविरहित शिकवण्यात काही अर्थ नाही हेच खरे.  हा धडा इतका भावनांनी ओतप्रोत का आहे हे नंतर कळले मला. हा धडा रा. ब. का. ना. साने ह्याच्या ‘चित्रमयजगत’ मासिकातला आहे.  आता हरी तात्या सारखे पुराव्यानिशी शाबीत करीन असे जरी नाही म्हणता आले, तरी आपल्या सर्वांना आपण हिस्टरी कशी शिकलो ते माहित आहेत. इतिहास जर एका गोष्टी प्रमाणे सांगितला तर नक्की रुचेला असता.

No Comment

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *