उठा उठा हो सगळालीक

रविवार सकळची वेळ , ” ऐ गणु , अरे चम्पक, वाटाण्या, रताळ्या (ही भाजीपाला मार्केटची नव्हे तर मित्रांची टोपण नाव) अरे मंगू  उठा की रे लेका ” योग्या तनानंला,

रविवार आहे तरी पहाटे पहाटे दहा वाजता हा का उडतोये बघायला राजा कशी बशी झोप आवरत नम्र पणे बोलला, “अरे गाढवा घुडग्यावर पड़ला का रे , रविवार आहे विसरला का !, का बोंबलतोय, झोप होऊ दे की जरा ”

योग्या शेर ला सव्वा शेर, “अरे जिंदगी गेली झोपण्यात, तिकडे तुझा बा शेत करुण काळा पड़ला आणि तू झोपा काढ, दोन विषय गेले तरी अभिषेक राव झोपा, काय ‘राजा’ ना तुम्ही  झोपा. ”

विषय गेले है शब्द ऐकून, वाटाण्याला आवरेना,   “हे बघ, टॉपर शेवटून पहिला, लय ज्ञान नको पाजू, विषयजाणे यात लक एक खुप मोठा फैक्टर असतो”

तितक्यात हॉस्टलचे ‘यूनाइटेड नेशंस कोफ़ी अन्नान’जागे झाले , “अरे पण पहाटे पहाटे फटाके वाजवायला ही काय दिवाळी आहे का, का वाजताय रे, काय झाल ”

“अरे लेकानो, आज आपल्या कॉलेजच्या टीमची फुटबॉल मैच नव्हे का , आपला  नान्या टीममध्ये  आहे , त्याला चीयर करायला जायला नको का नान्या आपल्यासाठी काय काय नाही करत  सकाळी उठून पानी भरतो, इमरजेंसी लाइट चार्जिंगला ठेवतो, आपल्याला उशीर झाला की मेसवरुन डब्बा आणतो, आर एखाद्या गड़ी सारखा राबतो, बरोबर का नाय रताळ्या

रताळ्या झोपेमध्ये मान डोलवत “हो, ऍग्री” आणि डोळे परत बंध.

तोपर्यंत मंग्या चनानला होता “उठा रे, चला अंघोळ करुण घ्या, चीयर करायला जाऊ.”

चम्पक तोपर्यंत झोपेत ऐकत बसला होता आणि एकदम एक सोज्वल प्रश्न त्याने विचारला ,”सकाळी सकाळी कस काय चीयर !” आणि नेहमीप्रमाणे मंग्याने आपली उशी मारून चम्पकची चालू केली आणि यात रताळ्यानी पण थोड़ा हाथ साफ़ करुण घेतला..

सगळा गोंधळ चालू आसताना राजा स्मार्ट होऊन बाथरूममध्ये घुसला, नंबर लावायला पण एका सेकंदामध्ये बाहेर आला आणि चिघळला “अरे अंघोळीला पाणी  नाही! नान्या त्याच्या, आज विसरला कसा काय !!”

योग्या ” राजा साहेब , रामायण झाले विचारा सीता कोण?”

कोफ़ी अन्नान उर्फ़ बंड्या उभे राहिले “अरे लय चमकनार आहे राजा तू नाव अभिषेक आहे  पण दूधाचा अभिषेक केला तरी तुम्ही ब्लैक बदकच राहणार आहत  चला रे, स्प्रे मारा आणि चला, काय आंघोळ राहु द्या, चमकता हुआ शर्ट  उसको एक  स्प्रे करा आणि चला.”

आणि दिलेला आदेश पाळत सगळे त्या १० x १२ च्या खोलित फिरू लागले, एकच आरश्यापुढे, रताळ्या उर्फ़ सोपान आणि वाटाण्या उर्फ़ नविन दोघे ही आपल्या मिलिट्री कटला कंगव्याने आकर देत होती. योगेश, योग्यानी टी शर्ट आणि हाफ पैंट घातली  मंगेश एकदम डोळे वाटारून “अरे चीयर करायला जायचा आहे  आपण फुटबॉल नाही खेळणार  काय हाफ पैंट घालतोय, बेवकूफ कुठला” योग्या परत हाफ वरुन फुल ला शिफ्ट झाला. बंड्या ने आपला पद लक्षात घेऊन कॉलेजचा एंब्लेम असलेला शर्ट घातला आणि सगळ्यांची पार्टी घेऊन रूमच्या बाहेर पडला.

मॅच दर्शन

तितक्यात चिन्मय उर्फ़ चम्पकने आपल्या नावाला शोभेल असा प्रश्न विचारला “पण जायच कुठे आहे?”

परत टपल्या खात त्याला उत्तर मिळाले “फुटबॉलची मैच काय लाइब्रेरीमध्ये असणार आहे का, ग्राउंड वर ना”

पार्टी हॉस्टलमधून बाहेर पडली असेलच की एक १० मीटर अंतरावर रिषी दिसला, योग्या त्याला म्हंटला “अरे रिषी तू तर टीममध्ये होता ना , परत कसा काय”

रिषी म्हंटला “मैच कवाची हरलो, लय सॉलिड टीम होती समोरची डिप्लोमा ची होती, लय बेकार”

“का रे , स्कोर काय झाला ?”   ग्रुप मधून आवाज आला

“आर वीचारु नकोस, सहा शून्य पर्यंत मोजला, तिथुन पुढे मोजन पण सोडून दिल ” रिषीने उत्तर दिले

सगळ्यांना हसु आवरेना , खी खी खी चालू झाली ..

बंड्यानी विचारल “आमच्या नान्याच काय”

रिषी एकदम तोंड वाकडा करुन “काय त्या नान्या ने सेल्फ गोल केला की र, ते गोल कीपर पांड्या ओरडतोय, थांब थांब, पण नान्यानी दिला शॉट, येडंबांगुल कुठलं.”

आता एक गोष्ट पक्की, आपण आपल्या रूममेटला भले ही चम्पक म्हणू पण दुसऱ्याने त्याला चिन्मयच म्हंटल पाहिजे,  रूमच्या इज़्ज़तचा प्रश्न आहे.

योग्या दनानला “कसा काय, नक्की काय झाला सांग”

रिषी म्हंटला “अरे हाफ टाइम झाला, परत आम्ही उतरलो आणि दुसऱ्या मिनिटाला ननुचा स्लेफ़ गोल. ”

योग्या आता आपली जिमची छाती बाहेर काढत “अरे लेका कुणी सांगितला का त्याला हाफ झाला आहे आता गोल तिकडे मार. कोण होता कॅप्टन”

योग्याचा आवाज आणि त्याचा ताव बघून रिषी जरा नरमला, एकदम हळू आवाजात “मी” निघाले

तितक्यात मैच मधला आव्या आला “काय बेकार हरलो, एक गोल करता आला नाही आपल्याला ”

मंग्या “अरे केला की, आमच्या नान्यानी केला, तुमच्यासारखे प्लेयर त्याच्याबरोबर , सांगता येत नाही का गोल तिकडे आहे  केला असता तिकडे पण , कसली टीम रे, हाफ टाइमला नीट सांगता येत नाही का, तुमच्या पायात बॉल बसत नाही. पुढच्या वेळी त्यालाच करा कॅप्टन.”

आता श्री चिन्मय बोलले ” अरे पण नरेश आहे कुठे , तुमच्याबरोबर नाही का”

रिषी ” अरे आम्ही निघालो, नान्या तिकडेच होता ग्राउंड वर ”

बंड्या “कसला कॅप्टन रे तू अस्सल लीडर, सगळ्यांना घेऊन येतो शेवटी  स्वतः चा विचार करतो, titanic नाही बघितली का”

आतापर्यंत रिषी आणि आव्याला काही कळेना, त्यांना guilty वाटयला लागले आणि कशाचे गिल्टी, ग्राउंड एक १०० मीटरवर तिकडुन लहान पोरग पण येऊ शकतो मग कोणासाठी का थांबायचं आणि हाफ टाइमला गोल पोस्ट पण बदलेली नव्हती! पण समोर सगळी पार्टी आणि आपण दोघे असा विचार केला आणि गप्प बसले.

तितक्यात रव्याच्या सायकलवर मागे कॅरिअर वर बसलेला नानू आणि त्याला ढकलत रवि आणत होता, ग्रुपमधले सगळे धावले.

सोपाननी नानूला पकडले आणि जवळच्या झाडाखाली बसवले, “अरे नानू काय झाल रे “, बंड्यानी विचारल. तोपर्यंत योग्याने कॅप्टनला पाणी आणायला दहाडले होते तो पण आज्ञाधारक बाळासारखा पळाला.

नानू म्हंटला “अरे त्या डिप्लोमाचा सांड होता,  त्याला tackle करायला गेलो आणि पायच मुरगळला र”

आव्या,  ” अरे ते तर मैच संपण्याच्या दहा मिनट आधीची गोष्ट आहे. तो तिकडेच थांबला  मला वाटल रेस्ट घेतोय, राहुदे म्हंटल , तिकडेच बरा परत इकडे आला तर इकडे सेल्फ …  ”,  वाक्य पूर्ण न करण्याचा शहाणपणा अव्याला जमला, नाहीतर योग्याच्या उजव्या हाताच्या range  मध्ये होता तो.

तितक्यात कॅप्टन पाणी घेऊन आला

नानू ” अरे मी किती हातवारे करत होतो, मला बदली खेळाडू द्या करा  पण कोणी लक्ष द्यायना”

सगळ्या ग्रुपनी एकदम रिषिकडे नज़र वळवली, रिषीने डोळे खालीकरून पाण्याची बाटली पुढे केली.

“जाऊ दे नानू निदान तू एक गोल केला  नाहीतर नाक नसती राहिली कॉलेज ची, तु गेल स्कोर, पुढच्यावेळी तुच कॅप्टन.” मंग्याने जरा नानूला दिलासा द्याचा प्रयत्न केला

परत येथेच्छ

मग मंडळीनी एक रिक्शा बोलवली आणि नानूला घेऊन सगळी पलटण हॉस्पिटलला गेली. तिथे नानूचे स्कैन झाला आणि  स्ट्रेस फ्रैक्चर आहे असे कळले. तोपर्यंत रिषी, आव्या आणि बाकी टीम परत गेली होती आणि फक्त हॉस्टलचे मुलं राहिले. नरेशचा परत नान्या झाला . प्लास्टर होइपर्यंत.  योग्या “आपली ऊँची किती, वॄन्दी किती, तोल किती, कशाला जायच पडायला त्याला “

मंग्या “लय वर्ल्ड कप जिंकणार होतो आपण, बेकहम नंतर आपलाच नंबर आहे ना”

एकंदरीत ‘नान्या गाढवा’ हा टोन होता.

सोपान आणि राजा उद्या पाणी कोण भरणार याची चर्चा करत होते, वाटाण्याला इंजेक्शनची भीति वाटते त्यामुळे तो हॉस्पिटल बाहेरच होता. बंड्या सगळ्या फॉर्मॅलिटी,  हॉस्पिटलचे फॉर्म, डॉक्टरशी बोलणे, नानूच्या घरी फोन करणे, औषधे आणणे, या सगळ्या जबाबदाऱ्यापार पाडत होता.

चम्पक डॉक्टरला “हे प्लास्टर किती दिवस राहणार, एडमिट किती दिवस, इंजेक्शन किती’, असे प्रश्न विचारुन वेळ घालवत होता तितक्यात मंग्या त्याला म्हंटला “का पाजालतोय, नंतर लक्षात राहणार आहे का उगाच डॉक्टरला वाटायचे तुला सगळ माहिती आहे आणि जायचा, आणि मग नान्याचा बा घेईल तुझी शाळा”, मग चिन्मय एका शहाण्याबाळा सारखा कोपऱ्यात बसलेल्या राजाकडे गेला ‘पाणी किती वाजता येत आपल्याला किती लागत, मग कोण उठणार’ ..  तिकडे वेळ घालवत बसला.

नानूला ३ दिवस ऍडमिट केले   पण त्याचा सेल्फ गोल तिकडे थांबला नाही  २ दिवसा नंतर, हॉस्पिटलमध्येच त्याला डेंगू झाला आणि त्याचा स्टे १० दिवस वाढला.  नानू नसताना ग्रुपला कळले पाणी सकाळी ७ ते ८ येते आणि १२ बादल्या भरून ठेवावे लागतात. रिषि, आव्या आणि बाकीची फुटबॉल टीमने पुढचे २ आठवडे ग्रुपला avoid करत घालवले. हॉस्टेलची पोरं, बारी बारीने हॉस्पिटलला जात होते, “नान्या, बेकहम ना आपण”, हे टोमणे मनसोक्त नाण्याला ऐकवायचे, आणि बेकहम हा फॉरवर्ड प्लेअर असून त्याचा आणि डिफेंडिंग याचा काही संबंध नाही ही फॅक्ट त्यांनी आपल्या टोमण्याच्यामध्ये येऊ दिली नाही !

अशी होती ती कोणी पण न बघितलेली फक्त ऐकलेली फ़ुटबाँल ची मॅच

सर्वात विशेष म्हणजे इंटर कॉलेज स्पर्धेत कॉलेजचा टॉप स्कोर म्हणून नानूला पहिले बक्षीस म्हणून एक सर्टिफिकेट आणि एक फुटबॉल पण मिळाला. !!!!!

1 Comment

  1. Radha pawar
    December 20, 2017
    Reply

    मस्त!!!!!!!!

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *