टेलीगू / हिंदी क्रॉसओवर चित्रपट ‘गेम ओवर’ प्रसन्नपणे आश्चर्यचकित करणारा होता. गेमिंगची संपूर्ण संकल्पना चमकदारपणे एकत्रित केली गेली. त्यातील थ्रिलर, सायन्स फिक्शन (साय-फाय) ने मला ‘the day after tommorow’ सारख्या हॉलिवूड चित्रपटांची आठवण करून दिली. पण, मी म्हटल्याप्रमाणे त्या चित्रपटाने फक्त आश्चर्यचकित केले. होय ‘फक्त’ ..

कारण जेव्हा मी ‘विक्की वेलिंगकर’ हा मराठी चित्रपट पाहिला तेव्हा मला जोरात धक्का बसला. 440 व्होल्टचा झटका.

मराठी चित्रपटात time-travel विषय असणे हेच धक्कादायक आहे. पण जेव्हा ते खरोखर चांगले हाताळे जाते तेव्हा ते अधिकच धक्कादायक होते.

चित्रपटाविषयी एक चांगली गोष्ट म्हणजे – चित्रपटाला शुद्ध थ्रिलर करण्याऐवजी ‘Groundhog day’ आणि ‘the day after tommorow’ यांचा क्रॉस म्हणून चित्रपटाची कथा आखली आहे . त्यात विनोदी घटक, थोडेसे सस्पेन्स, काही थ्रिल आहे. म्हणजे एकंदरीत मसाला व्यवस्तीत आहे, उगाच फालतू romance नाही, कथा नेहमीच मध्यवर्ती थीमवर चिकटून राहते.

कथेमध्ये मध्यवर्ती व्यक्तिरेखा विक्की वेलिंगकर ही आहे. ती एक struggle करणारी कॉमिक (व्यंगचित्र) artist दाखवलेली आहे. एका दिवशी तिला कुरिअरमध्ये एक घड्याळ घेते. ते घड्याळ घातल्यानंतर ती बारा तासांच्या टाइम लूपमध्ये अडकते. लूप मध्ये एका मारेकरी तिचा पाठलाग करत असतो. तिचा जर मृत्यू झाला तर लूप रीसेट होतो, आणि ती परत जैसे थे, ती लूपच्या सुरवातीला पोचते. तिला एकूण १० attempt असतात, त्या आत तिला मारेकरीला शोधून संपवायचे असते, नाहीतर तिचाच ‘game over ‘. प्रत्येक पुनरावृत्तीमध्ये कांद्याची एक थर सोललेली जाते. एक एक करून सस्पेन्स उघड होते, एवढे करून मुख्य सस्पेन्स तरी शेवटी राहतोच.

चित्रपटातील सर्व कॅरेक्टर्सचे चित्रण उत्तम झाले आहे. पण सर्वोत्तम भूमिका असेल तर ती – ‘आई आजी’ ची. आणि जेव्हा आजी म्हणते “ओह माय गॉड, ब्लू झोन येत आहे”, तो क्षण epic आहे. आर्ची-पार्ष्या, PUBG, डॅमबिस, अश्या tropes असलेले हे लिखाण समकालीन आणि खूप मजेदार आहे.

चित्रपटाविषयी एक चांगली गोष्ट म्हणजे, चित्रपटात विज्ञानावर जास्त वेळ घालवलेला नाही. बर्‍याच भारतीय साय-फाय चित्रपटांमधे विज्ञानाचे स्पष्टीकरण फारच विचित्र राहते. किंवा ते भूत, जादूटोणा अवलंबून राहतात आणि concept चा मजाक होतो. ही मूव्ही असे मानते की आपण बर्‍याच साय-फाय चित्रपट पाहिले आहेत आणि आपल्याला अश्या संकल्पना माहित आहेत. जास्त explaining नसल्यामुळे आपले cringing वाचते. चित्रपटाविषयी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याची साधेपणा. उदाहरणार्थ जेव्हा विकी तिच्या मित्राचा आणि तिच्या आईच्या वारंवार मृत्यूमुळे गोंधळात पडते तेव्हा तिला एक सोपा उपाय सापडतो. ती त्यांना शहराबाहेर आणि climax बाहेर पाठवते. उगाच तंटा नको.

चित्रपटात एकमेव गोष्ट missing आहे. ती गोष्ट जर चित्रपटात असती चित्रपट बर्‍याच level वर गेला असता. चित्रपटाच्या शेवटी, Marvel चित्रपटांसारख्या पोस्ट क्रेडिट्स scene असायला पाहिजे होता. विकी तिच्या घड्याळाची बॅटरी रिचार्ज करते, लूप 24 तास रीसेट करते, आणि तिच्या मैत्रिणीला परत जाऊन वाचवते… हा scene असता तर त्यापुढे Deadpool फिका पडला असता.

जर आपल्याला वेळ मिळाला तर ते Amazon प्राइम वर नक्की पहा आणि हो क्लायमॅक्स आपल्या आवडीस अनुरूप ठरणार नाही. परंतु जर आपण वेळ दिला तर आपल्याला हे समजेल की तोच क्लायमॅक्स, त्याच अप्रामाणिकपणामुळे आणखीनच मजेदार वाटतो. त्यात एक भन्नाट वेडेपणा आहे !

शॉक मध्ये डेडपूल

The Breakdown

विनोद 9.0
मेंदूला ताण नाही 9.5
आजी आणि PUBG 9.9
क्लायमॅक्स 9.0
Just like that 9.5

2 Comments

  1. Daga
    September 27, 2020
    Reply

    Had I not had my discriminatory passions causing the language barrier, I might have considered watching this movie, just for the heck some one is trying something new. The trailer reminded me of Veronica Mars but your review gave a different outlook. Though plot-line will be absent but would have been keen to see the treatment of this genre. Hope more such movies will be made, and it would be fun to watch it in cinema screens

    • September 27, 2020
      Reply

      watching it in cinema screens will be stretching things a bit…the movie does have some songs which are better forwarded while watching online,, however yes, watching on 14″ laptop will be much better than 6″ phone screen

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *