रविवारची सकाळ, बंड्या पेपर वाचता वाचता गणूकडे वळाला आणि चालू झाला, “काय गण्या, एक नंबर बातमी आहे बघ आज.”
गणूला आतापर्यंत बंडोपंत साहेबांची चांगली ओळख झाली होती त्यामुळे जास्त कुतूहल न दाखवता, निवांतपणे विचारले, “काय बातमी आहे?”
बंडूला आपला ऑडियन्स मिळाला हो जा शुरु, “तुला माहिती आहे का, आपल्या मार्केटयार्डला नवीन बस डेपो होणार आहे!”
गणू, “म्हणजे आता बसेस वाढणार, आपल्याला सोयीचे होणार!”
पण गणूला माहित होते कि बंडोपंत काहीएवढ्यावर थांबणार नव्हते त्यामुळे त्याने रूमवर नुकत्याच शिरलेल्या मंगू समोर टाळीसाठी हात पुढे केला.
सवयीप्रमाणे बंडू चालू राहिला, “गणूशेठ कधीतरी लांबचा विचार करा! अहो, आता आपल्याकडे बस डेपो होणार. आत्तापर्यंत आपण ज्या बसमध्ये बसून इकडे येतो, त्याच्या मागे काय लिहिलेले असते, शिक्का कसला असतो, माहिती आहे का?”
गणू , “नाही” थोडा चेहरा पाडून बोलला, ‘as expected’ आता आपल्या वाट्याला बोधकारक वाक्ये येणार, याची तयारी होती ती.
बंडू, “आपण सुशिक्षित आहोत, याचा उपयोग करून घेत जा, वाचा, लक्षात ठेवा, GK, काही असते का नाही !! असुदे, तर, प्रत्येक बस मागे त्याबसच्या डेपोचा शिक्का असतो सध्या आपल्याला डेपो नाही तर शिक्का स्वारगेट असा असतो. डेपो झाला की शिक्का मार्केटयार्ड येणार. म्हणजे एखादी बस, मार्केटयार्डची आहे का नाही, ते आपल्याला बसच्या मागच्या शिक्क्याने कळणार!
आपण कुठे हरवलो असलो तर शिक्का दिसला कि लागायच पेंडल मारायला, फोल्लोव करा आणि न चुकता back to pavilion व्हा”आता नुसता गणू असता तरही बात हजम पण झाली असती पण मंगूची ट्यूब पेटली,
“पण मागून कळणार कसं, बस मार्केटवरून आली आहे की मार्केटकडे चालली आहे?”
त्या वेळी बंडोपंतचा झालेला चेहरा : त्याला पुणेरीभाषेत “कोडक मोव्हमेन्ट” म्हणतात.
Ha, ha, a long winded joke that goes no where!!!