प्राधान्यक्रम
नेहमीप्रमाणे रविवार सकाळ (साधारण ११:४५ ), आळस आवरत चंपक उठला , तोंड धुवत त्याची नजर बंड्याकडे गेली . बंडोपंत कपबोर्ड मधली पुस्तके आवरून ठेवत होते.
चंपकने माफक प्रश्न विचारला ” काय बंड्या, काय करतोय चला जरा नाश्ता पाणीच बघुयात ?”
बंड्याने आपल्या नेहमीच्या पुढारी भाषेत उत्तर दिले, ”अहो चंपक राव, कधीतरी खाण्या पिण्याच्या पुढे बघा, इथे या सेमिस्टरची पुस्तके शोधून अरेंज करून ठेवतोये म्हणजे आपल्याला परीक्षेला महत्वाचा आहे,…. तर जरा तुम्ही तुमच्या पोटाला सांगा, थांब म्हणून”
तितक्यात गणू उठला होता, चंपकचा प्रश्न आणि त्याला मिळालेले उत्तर दोन्हीचे बोध घेत गणू ने चादर तोंडावर ओढली आणि अजून २ तास तरी नाश्ता नशिबात नाही, तर निदान झोपून घ्यावे कारण दोन आठवड्यापूर्वी श्री बंडोपंत यांचा गाद्या झटकुन परत ठेवण्याचा कार्यक्रम ३ तास चालला होता आणि इथे तर पुस्तके वाचून अरेंज होत होती, निदान ३-४ तास चालणार हे नक्की!
राजा पण गणूचा शहाणपणा अंगी घेऊन चादर ओढू लागला.
तितक्यात ग्रुपचे चावरे म्हणून ओळखले जाणारे, श्री मंगू उठले. झालेले संभाषण त्यांच्या कानावर पडले होते आणि त्यांची ट्यूब पेटली, “बरोबर आहे बंड्या, ते exam च्या वेळी नेहमी पुस्तकांचा गोंधळ होतो बरं झालं तू आवरुन घे तोपर्यंत मी तुला एक गोष्ट सांगतो एका प्रवचनात ऐकली होती मी.”
चंपक, “पोहे, शेंगदाणे, … जाऊ दे, सांग ”
बंड्या, “वाह, प्रवचनाला जाता म्हणजे तुम्ही, वाटलं नव्हतं, बोला..”
उवाच
मंगू बोलू लागला,
“एक धर्मवीर म्हणून राजा होता. हुशार, धाडशी आणि महत्वाचे म्हणजे तो महत्त्वाकांक्षी होता. आपल्या बंड्या सारखा (हरबराचे झाड !)
त्याची एक महत्वाकांक्षा होती आजूबाजूचे ५ राज्य त्याला जिंकून आपल्या राज्यात शामिल करणे. त्याने एक मोठे सॆन्य उभे केले आणि पराक्रम गाजवत एका मागे एक अशी चार राज्ये काबीज केली. त्याची नजर आता राहिलेल्या पाचव्या रितनगर राज्यावर होती. रितनगरचे सॆन्य कमजोर होते आणि शेवटी जिंकायला सोपे अशे राज्य मुदामून धर्मवीरने ते ठेवले होते. कारण त्याला एक ऋषीमुनी ने सांगितले होते कि आधी अवघड काम करावीत मग सोपी ”
“बरोबर आहे, चांगली शिकवण आहे” बंड्या ने interrupt केले
इग्नोर करत मंगू कॅन्टीनुए करू लागला,
“सोपे राज्य म्हणून, राजा माफक सैन्य घेऊन निघाला. जास्त घोडे, रथ, न्हेने टाळले, त्याला लवकर पोचून आपली मंजिल साध्य करायची होती, जास्त ओझे नको, लवकर पोहचू असा विचार आणि तो निघाला. रितनगर त्याच्या हिशोबाने ३ दिवसाची मोहीम अशी त्याची तयारी. पण रस्त्यात पिरू नदीला पूर आला होता आणि त्याचे दोन दिवस पाणी कमी होण्याची वाट बघण्यात गेले. पाणी उतरले आणि राजा क्रॉसकरून मोहीम रिजूम केली. रितनगरच्या सीमेवर पोहचल्यावर राजाला त्याच्या सेनापतीकडून कळाले कि बरोबर आणलेली सगळी अन्न सामग्री संपली आहे, दोन दिवस जास्त लागल्याने आणलेले सर्व अन्न संपले होते. संध्याकाळची वेळ होती त्यामुळे रात्री तर युद्ध करणे शक्य नव्हते, पण उद्या उपाशी पोटी सैन्य न्यायचे!”
इतक्यात सगळे झोपलेले, सस्पेन्समुळे जागे होऊन बसले होते, नीट लक्ष देऊ लागले
मंगू आता फॉममध्ये आला होता.

त्या रात्री रितनगरच्या बाहेर सीमेवरील एका गावात सॆन्य घुसले. राजाला खूप भूक लागली होती, त्याने आपल्या सैनिकाला धाडले, “जा गावातील एका घरातून जेवण घेऊन ये , त्या घराला मोबदल्यात युद्धामध्ये अभय देऊ असे सांगा त्यांचे घर नष्ट करणार नाही हा शब्द द्या”
सैनिक निघाले त्यांना एक लहानसे घर दिसले राजाची ऑफर त्यांनी तिथल्या एका बाईला सांगितली. मावशी, “तुझ घर युद्धात नीट राहिल, हा वादा”.
हे ऐकून मावशी म्हणाली, थांबा मी आतजाऊन ताट भरून ठेवते, बोलवा तुमच्या राजाला. सैनिक गेले आणि राजाला घेऊन आले. राजा घोड्यावरून उतरला. त्याचा आवाज ऐकताच मावशी एक ताट घेऊन बाहेर अली. पण त्या ताटात जेवण नव्हते, त्यात तिने घरातले सोने, काही मोती, तिच्या बांगड्या, चांदीचे नाणे ठेवले होते.
“हे काय आहे” राजा दणाणला.
“धर्मवीर राजा, तू तुझे राज्य सोडून एवढ्या लांब का आलास, या सोन्यासाठीच ना, उद्या तू युद्ध करणार कशासाठी, मोती, संपत्ती वाढवावी म्हणूनच ना मग तेच मी तुला आज देते ज्याची तुला हाव आहे ” मावशी बोलली.
हे ऐकून राजा थक्क झाला आपण कशासाठी युद्ध करतोय याचा प्रश्न त्याला पडला. दुसऱ्या दिवशी तो आपले सैन्य घेऊन परत आपल्या घरी गेला.

“तात्पर्य काय, जास्त हाव करू नये, Greed is not good”, बंड्या बोलला.
मंगू म्हंटला “नाही, एवढ्यालांब गेला राजा , तो का परतला कारण त्याला भूक आवरेना, त्याला कळले, त्याला अन्न लागते !, म्हणून म्हणतो बंडोपंत, आमच्या पोटाला पण जरा अन्न मिळू द्या. धर्मवीरला कळले आता तुम्ही समजूनघ्या, आमच्या पोटाच बघा !”
हे वाक्य ऐकताच पुर्ण रूमला हसू सुटले. खी खी खी खी खी
बंडूने पुस्तके बाजूला ठेवली आणि म्हणाला, “चला आजचे पोहे माझ्याकडून”

Very nice